Tuesday, March 2, 2021

साबुदाणा खिचडी

साबुदाणा  खिचडी

मी अमृता, घेऊन आले आहे तुमच्यासाठी उपवासाची तुमची आणि माझी आवडती स्पेशल साबुदाणा खिचडी,
चला तर मग बघूया याची रेसिपी.

साहित्य ः
भिजवलेले साबुदाणे  4 वाटी ,
उकडलेले बटाटे  2 किंवा 3,
शेंगदाण्य़ाचा कूट  तुमच्य़ा आवडीनुसार ,
चवीनुसार मीठ,
चिमूटभर साखर ,
हिरव्य़ा मिरच्य़ा 2-3 ,
तेल.







कृती ः
  • साबुदाणे पाण्य़ाने 2-3 वेळा  स्व्च्छ  धुवून घेणे आणि 20-30 मिनीटे  भिजवत ठेवणे.नंतर त्यातील पाणी काढून टाकणे आणि 3 तास झाकून ठेवणे म्हणजे ते छान फुलतील. 



  • उकडलेले बटाटे साल काढून कट करून ते भिजवलेल्या साबुदाण्यात घालणे त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट करून तोही साबुदाण्य़ात घालावा.




  • चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर हे सगळे एकजीव करून ठेवणे.





  • एका कढईत 2-3 चमचे तेल मिडीयम आचेवर गरम करत ठेवणे.
  • 2-3 हिरव्य़ा मिरच्य़ा कट करून  त्य़ा गरम तेलात परतणे, त्य़ानंतर एकजीव केलेले मिश्रण कढईत परतणे.




  • 2 मिनटे झाकून ठेउन परत हलवत राहणे म्हणजे करपणार नाही. पाण्याचा हबका मारून 1 मिनीट  झाकून ठेवणे आणि परत हलवणे. गॅस बंद करणे.



ही रेिसिपी घरात करायला विसरू नका,अगदी सोपी आहे आणि खायलाही रूचकर लागते. रेसिपी आवडल्यास Like, Comments ,Share आणि Subscribe करायला विसरू नका.

Be Happy, Be Healthy, Be Positive👧
Thank You












No comments:

Post a Comment

If you any questions or any daughts , So please let me know guys

Prince Theme Cake - Chocolate cake

https://youtube.com/shorts/O918MPskd0g?si=DWCCQyCwVgF732-i